जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून वंचित आघाडीचे आंदोलन

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नरेंदर कब मिलेगा सिलेंडर असे म्हणत राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. यावेळी चुलीवर भाकर बनवून जिल्हाधिकाऱ्यांना तयार केलेले जेवण, मागण्यांच्या निवेदनासह देण्यात आले. देशात गॅस टंचाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत
आहे. यासाठी सरकार जबाबदार असून गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित करावा, अशा विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हा निरीक्षक योगेश बन, पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, नगरसेवक करुणा मेघनाद जाधव, पश्चिम शहराध्यक्ष
पंकज बनसोडे, प्रज्ञा साळवे, संदीप जाधव, वंदना जाधव, कोमल हिवाळे, मतीन पटेल, साधना पठारे, राहुल मकासरे, अक्रम खान, प्रविण हिवाळे, अंजन साळवे, उमेश सरदार, राजू किर्तने, खुशालराव बनसोडे, एस. पी. हिवराळे, संघपाल इंगोले, रवि रत्नपारखे, मुंजा तुपसुदरे, सोमनाथ महापुरे, सुरेश मुळे, बाबासाहेब खाडे आदी उपस्थित होते.